Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसात वृत्तपत्र विक्रेत्यांचे कार्य अविरत|NewspaperVendor |Sakal Media

2021-07-18 720

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसात वृत्तपत्र विक्रेत्यांचे कार्य अविरत|NewspaperVendor |Sakal Media
मुंबई - काल मध्यरात्री पासून मुंबईला पावसाने झोडपून काढले बरसणाऱ्या संततधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.परेल हिंदमाता लालबाग बीडीडी या भागासह सर्वच ठिकाणी पाणी साचलेले पहावयास मिळाले.लालबाग गणेशगल्ली येथे तर पाण्याच्या प्रवाहाबरोबर रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकी हि वाहताना दिसून आल्या.डीलाईल रोड सह बीडीडी चाळीत हि मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर असल्याने तळमजल्या वरील खोलीतून पाणी साचल्याने मिळेल त्या ठिकाणी आसरा घेत राहिवाश्यानी रात्र जागून काढल्याचे चित्र दिसून आले. अशा कठीण परिस्थिती मध्ये देखील नेहमीच ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता आपली सकाळ वाचनीय प्रसन्न करण्यासाठी मेहनत घेणारा वृत्तपत्र विक्रेता मात्र थांबला नाही सर्वत्र पाणी साचले असतानाही यातून मार्ग काढत अचूक व योग्य माहिती पुरवणारे वृत्तपत्र वेळेत पोहचवण्याचे कार्य वृत्तपत्र विक्रेते करताना दिसून आले. पुढील आठवडाभर मुंबई सह उपनगरात हि मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात असून सर्व मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#MumbaiRain #NewspaperVendor #Rainupdate #HeavyRain #MumbaiRainUpdate

Videos similaires